Sunday 27 August 2017

सामूहिक अध:पात

एक काळ होता साधेपणा, विरक्ती, सभ्य भाषा व उदात्त विचारसरनी ही संतांची लक्षणे समजल्या जायची. आता त्याची जागा भपकेबाजी, पैश्याचे कीळसवाने प्रदर्शन, उग्र भाषा याने घेतली आहे. असे का झाले ? साधी, सरळ राहणी जगणाऱ्या व्यक्तीला पूर्वी समाजात मान होता. आताच्या काळात आपल्या समाजाचे सामुहिक स्खलन झालेले आहे. कुठल्याही मार्गाने धनाढ्य झालेल्या ऐतखाहू माणसाला समाजात जो पर्यन्त डोक्यावर घेतल्या जाईल तोपर्यन्त फक्त 'पैसा' हाच या समाजाचा धर्म राहील. अश्या अध:पात झालेल्या समाजात आदर्श म्हणून स्वीकारावे अशी लोकं अपवादानाचेच निर्माण होतील. आपले आदर्श जर चुकीचे असतील तर ती चूक आपली आहे. आपण केलेल्या चुकीच्या मूल्यांची पेरणी आज आपणच भोगत आहोत. या सामुहीक अध:पतनास समाजातील एक घटक म्हणून आपण सर्वेच जबाबदार आहोत. ही जबाबदारी आपण स्वीकारलीच पाहिजे. येणाऱ्या काळात तर ही विषवल्ली आणखीनच फोपावत जाईल, या साठी कुठल्याही ज्योतिष्याची गरज नाही. चुकीच्या बेंचमार्किंग वर झालेला प्रवास हां चुकीच्याच दिशेने होणार आहे. निघालोय चोराच्या आळंदी आणि पोहचु देवाच्या आळंदीत ही अपेक्षाच चुकीची आहे. पार भुसभूशीत झालेल्या पायावर उभी केलेली इमारत वरुन कितीही देखणी असली तरी आतून मात्र पोकळ राहणारच. अश्या समाजात मग सकाळच्या दुधा पासून तर रात्रीच्या जेवनापर्यन्त सर्वच अशुद्ध मिळणार. आपले डॉक्टर गरज नसताना शस्त्रक्रिया करणार. शिक्षक शिकवनीसाठी हपापनार. पोलीस वेगळ्याच उद्देशाने रस्त्यावर उभे राहनार. शेतकरी भाजीपाल्यावर हार्मोंनची फवारणी करणार. व्यापारी बेलागम भावात माल विकणार, नाना मार्गाने कर बुडवनार्. जमिनेचे भाव कुत्रिम रीत्या वाढवले जाणार. शाळा मोठी फी आकरणार. अश्या काळात सर्वानी योग्य सेवा द्यावी ही अपेक्ष्याच्  फोल आहे. आपला सामूहिक अध्:पात झालाय हे पर परत  मान्यच  करावे लागेल. आपले रेफरन्स पॉइंट (आदर्श) बदलल्या शिवाय काही अर्थ नाही.

सुधीर वि. देशमुख
रविवार
27/08/17

Sunday 13 August 2017

खरेदी एक भोग !

खरेदी एक भोग !
जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्य प्राण्याला खरेदी करावी लागते. ज्याने आयुष्यात कधीच खरेदी केली नाही असा व्यक्ती कदाचितच असेल. अन्न, वस्त्र, निवारा ह्या जश्या मुलभूत गरजा होत तशीच खरेदी सुद्धा मुलभूत गरज आहे. किंबहुना खरेदी मुळेच ह्या गरजा भागू शकतात. मानवी उत्कांतीचा इतिहास हा खरेदीचाच इतिहास आहेे. खरेदी प्रकियेत ग्राहक व विक्रेता हे दोन मुलभूत घटक जसे अंतर्भूत असतात तसेच ईतर अनेक घटक देखील यामधे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या अंतर्भूत होत असतात. आजच्या काळात माणूस हा माणूस आहे का नाही हे खात्रीलायक रीत्या सांगणे धाडसाचेच होईल. पण माणूस हा ग्राहक मात्र आहे.  हा ग्राहक राजा आहे का नाही हा मात्र संशोधनाचाच विषय आहे. या ग्राहकावर कशी सर्व विक्रेत्यांची शोधक नजर असते हे सर्वांनाच माहित आहे.
दुकानदार होणे हि फार मोठी कला आहे. जसे जातिवंत कलाकार जन्म घेत असतात तसेच सच्चा दुकानदार सुध्दा जन्माला यावा लागतो . जोतिष्यकार मानसशास्त्र जाणतो तसेच दुकानदार सुद्धा मानसशास्त्राचा जाणता असणे आवश्यक आहे. सच्चा दूकानदार सुरवातीला या साहेब, या मँडम म्हणत हळूहळू माणसाच्या हृदयात शिरतो आणि तेथून हळूच आपल्या खिशात शिरुन त्याला कात्री कशी लावतो हे कळू देत नाही. विक्रेय कलेला चौसष्ट कलेत स्थान आहे का नाही मला माहित नाही, पण ती एक फार मोठी कला आहे हे मान्यच करावे लागेल. एखाद्या वस्तूचा भाव विचारल्यावर “आपके लिये दाम क्या चीज है !” पासून सुरु झालेला हा प्रवास पुढे पुढे एका निर्णायक टप्यावर दुकानदार अलगद नेवून ठेवतो. दुकानदाराने “औरो के लिये पचास रुपये लेकीन आप बस चालीस हि देना ! असे म्हटले कि आपली छाती एक दोन इंचाने वाढते व जिथे एक वस्तू घ्यायाची आहे तिथे दोन तिन घेतल्या जातात. दुकानदार आपल्यालाच का स्वस्त विकतो ? एक दोन नव्हे तर अनेक दुकानदार मला ‘बस आपके लिये ये कम भाव है!’ असे म्हणू लागले तेव्हा आपण यांचे कोण विशेष ? हे आपल्याला कमी भावात वस्तू कसे  देतात? असले प्रश्न सतावू लागले खरे तर दुकानात आलेल्या बहुतेक ग्राहकांना असे म्हणतच  पटवल्या जाते हे मला काही वर्षांनी कळले.
साडीच्या दुकानातला विक्रेता तर प्रचंड संयमी असतो एखाद्या संताला शोभावे एवढे शांत मन यांना ठेवावे लागते. ग्राहकाला नेमकी कुठली साडी पसंत येवू शकते याचा नेमका अंदाज घेत त्याला तिमिरातून तेजाकडे प्रवास करत जावे लागते. नेमका कुठला रंग व कुठला पँटर्न पसंत येवू शकेल हे खुद ग्राहाकाला ही माहित नसल्यामुळे त्याला एक एक पायरी चढत-चढत हा जटील प्रवास कराचा असतो. शेवटी ग्राहकाला पसंत येतच नाही म्हटल्यावर “तो हळूच आपके रेंज में बस येही मिल सकता हैं “ असे म्हणत थेट ग्राहकाच्या स्वाभिमानाला हात लावतो. ( रेंज हा फार गमतिशीर प्रकार आहे आपल्याला पसंत येणारी वस्तू बहुतेक आपल्या रेंज मधे नसतेच शिवाय आपली रेंज आपल्या पेक्षा विक्रेता ठरवतो.) “साहब क्या नहीं बोलने वाले है क्या ?” लगेच दुसरी फुसकी सोबतच्या व्यक्तीकड़े पाहत सोडण्यात येते. सोबत आलेला प्राणी जो बहुतेक लहान मुल, बँग व शेवटी बिल देण्याच्या शिल्लक कामासाठी आलेला असतो मुकाट्याने हे सर्व बघत असतो. (सोबत असलेल्या या मूक प्राण्याला मराठीत नवरा असे म्हणतात हे सुज्ञ वाचकांना संगाण्याची गरज नाहीच) अनुभवातून तो हे शांत बसुन राहणे शिकलेला असतो, त्याचे हे शांत बसने गृहीत धरल्या जाते व तो चतुर विक्रेता लगेच वरच्या भावाच्या साडीचे डब्बे आणून टाकतो. अश्या पद्धतीने हळहळू रेंज वाढत जाते. नंतर “ ये माल कलही आया है !” अशी पुस्ती जोडन्यात येते समोरच्या ग्राहकाला खास ठेवनितला माल दाखवत आहे असे पटवून देण्यात येते. वर "ये सिर्फ हम हमेशा के ग्राहक को ही  दिखाते है!"अशी शेपटी जोडण्यात येते. हमेशा का ग्राहक होण्यासाठीची अट काय असते हे त्या दूकानदार लोकांनाच माहीत. एकदा  मी एका लग्नासाठी भेट वस्तु घेण्यासाठी दुकानात गेलो असता "आप क्या हमारे हमेशा के ग्राहक इसलिए ये भाव लगा रहे!", सुरु झाले. खरे तर मी त्या दुकानातच काय त्या शहारत ही प्रथमच गेलो होतो. शेवटी एक साडी पसंत आल्यावर “बस एकही?” असे म्हणत “साहब क्या नही बोल रहे हैं ?” परत सुरु होते अश्या प्रकारे हजार रूपया पर्यंत एका साडी साठी गेलेले दाम्पत्य, पाच  हजाराच्या दोन-तिन साडया घेवुन दुकानाच्या पायऱ्या उतरतो. उतरताना एकाच्या चेहऱ्यावर विजयी भाव असतो तर दूसरा आपला या खरेदी मुळे विस्कटलेली घड़ी जुळवत असतो.
विकत घ्यायच्या हेतूवर वस्तू कुठली दाखवायची हे ठरत असते . एकदा मी अशीच एक वस्तू घेत होतो, “इससे सस्ता नही क्या?” असे दोनचार वेळा विचारून झाले. “शेवटी देणे के लिए होना क्या ?” असे विचारण्यात आले, मी हळूच हो म्हटले. नंतर वेगळ्या गटातली वस्तू मला दाखवण्यात आली. “क्या साहब पहले बोलेनेका ना, देणे के लिये होना !” असा उपदेश त्या वस्तू सोबत मोफत बांधत मी बाहेर पडलो.
मूळ वस्तू सोबत फ्री भेटनार्या किरकोळ वस्तूचे चोखंदळ ग्राहकाला विशेष आकर्षण असते. या फ्री वस्तूंच्या नादात बिनकामाच्या वस्तू घरात येवून कशा ठान मांडतात कळत नाही. मुख्य वस्तूपेक्षा या फ्री मिळणाऱ्या वस्तूंवर नजर ठेवून खरेदी करणे म्हणजे धाकटी वर नजर ठेवून थोरलीशी लग्न  करण्यासारखे आहे.
अलीकडे लहान मोठया शहरात मॉल नावाची बाजार संस्कृती उभी झाली आहे. इथे कोणी पटवून देणारा विक्रेता नसतो परन्तु वस्तूच एवढ्या विशेष पद्धतीने मांडलेल्या असतात कि घेनाराच्या पदरात (ट्रॉलीत) अलगद येवून पडतात. तारुण्याच्या उंबरठ्यावर नुकतेच पाहुल ठेवलेल्या नवयुवकाला कुठे कुठे पाहावे असे होते, तसेच काहीसे येथे होते. विश्वमित्राची समाधी भंग करासाठी देवाने अप्सरा पाठवली होती, येते तर एक एक वस्तू ग्राहाकाचे चित्त विचलीत करत बसल्या असतात. .शेवटी बिल देणारा हाथ जरी ऐक असला तरी ट्रॉलीत वस्तू टाकणारे हात मात्र अनेक असतात. बिल देतांना या हातामागचे कर्तेधर्ते माहित होते. मग एक एक वस्तू ची कशी गरज आहे हे पटवून दिल्या जाते. एखादी वस्तू बाहेर काढून ठेवावी तर लगेच 'पप्पा ! ' असा लाडीक आग्रह कानावर येते. ही खरेदी घरात नव्यानेच निर्माण झालेल्या ग्राहकाची असते. हल्ली लहान मुल जन्म घेतच नाही, जन्म घेतो तो थेट ग्राहकच. या ग्राहकासाठी नाना वस्तू बाजारात दिमतीला हजर आहेत, फक्त खिसा सैल करण्याची तयारी हवी. स्वयंपाक खोली पासून तर स्नानगृहा पर्यंत च्या एक एक वस्तू एकाच ट्रॉलीत गुण्यागोविंदाने प्रवेश करतात व् हा ग्राहक राजा मोठ्या दिमागात  लांब लचक बिल घेवून बाहेर पडतो. बिलावर शेवटी यू सेव्ड ×× बघून त्याचा चेहरा खुलते. xx वाचवा साठी मात्र बरीच "xxxxx"  चुकवावी लागते.
खरेदीतला दूसरा प्रकार सेल, मोठा गमतीशीर येथे ग्राहक निव्वळ विजयी होण्याच्या भूमिकेतूनच उतरलेला असतो. काहीही घेतले तरी आपला फायदाच फायदा असे त्याच्या डोक्यात जाम बसलेले असते. सेल मधे पसंत आलेला शर्ट बहुतेक आपल्या मापाचा नसतो असलाच तर नेमका मोक्याच्या जागी उसळलेला असतो.
बाकी खरेदीत हल्ली नवनवीन प्रकार रुळ झालेले आहे त्यामधे टेलीशॉपिंग, ऑनलाइन, नेटवर्क मार्केटिंग इत्यादी प्रकार आहेत याविषयी नंतर कधीतरी.

सुधीर वि. देशमुख
अमरावती
रविवार
१३/०८/१७




 

Thursday 10 August 2017

सरहद

घर के सामने एक पेड़
मैं देखता हु  आते जाते
एकदिन एक पंछी देखा
पंछी जो कभी न देखा पहले कभी

मैं देखता रहा उसे
उसका रंग रूप
सबकुछ अनदेखा अनजाना
कुछ अलग सा था बाकी से

कुछ दिन में गुल मिल गया
उस पेड़ की बाकि पंछीसे
इसतरह की ओ था यही
कही सालो से

मैने न रहकर पूछा उसे
नये लगते हो
किस गांव किस शहर से हो
वो चुपचाप बैठा रहा गाता रहा

मेरे से नहीं रहा गया
एकदिन सुनहरी श्याम
मैंने फिर छेड़ा
इस देश के भी हो या नहीं

उसने देखा मेरे तरफ
मुस्कराया, गाया और बोला
" सरहद तुम्हारी होती है ! हमारी नहीं ! "
और मैने शर्म से सर झूखा लिया

सुधीर देशमुख
अमरावती
06/03/16

Wednesday 9 August 2017

एकच प्याला


भूक


नरदेह




चेहरा

तुला हवा तो चेहरा नेमका मी धरु कसा
खोटे खोटेच दिलासे तुला मी देवु कसा
जे नाहीच ओंजळीत माझ्या ते देवु कसे
तू रडलिस तेव्हा दाबला हुंदका मीही माझा
उसनी शब्दांची दौलत का मांडू
कशास गावे मी मैफलित तुझ्या
सांगतो बोलन्यास तूच तरीही
का दाबतेस आवाज माझा
लुटला गेलो पुरता तरीही
अजुन ताठ कणा माझा
सुधीर देशमुख
अमरावती
08/08/16

तु

"तु"
चर्चा आता शहर शहर
तझे रूप कहर कहर
झाली नजर ठहर ठहर
असा यौवनाचा बहर बहर
वळे हरएक नजर नजर
असा तुझा असर असर
दीसे तूच प्रहर प्रहर
जसे लागले जहर जहर
सुधीर
01/09/16

मी कोण ?

माझा कुठला धर्म, माझा कुठला पंथ
मी कुठल्या तळ्यातला, माझा कोण संत
माझी कुठली जात, कुठली उपजात
नेमकी कुठल्या समईतली, मी वात
निळे अंबर, हिरवा निसर्ग
भगवा सुर्योदय, कोणाचा कुठला रंग
हा संप्रदाय, तो संप्रदाय
ज्याचा त्याचा आपआपुला समुदाय
अनादी मी, अनंत मी
आत्ममग्न, निसंग मी
सुधीर देशमुख
अमरावती
10/10/16

"प्रार्थना"

"प्रार्थना"
माझीया दारात देवा, डेरा तुझा असू दे !
गीत ओठात माझ्या तुझे वसू दे !
कळू दे प्रित राधेची, मीराची भक्ती,
तुझ्या बासरीचे सुर इथेही घुमू दे !
दारात तुझ्या रांग भक्तांची मोठी,
"दिवा" सुखाचा त्यांच्या घरी जळू दे !
तुझ्या लेकरांची वीवंचना फार,
कुरुक्षेत्री ईथे, सारे अर्जुन आहे !
सुधीर देशमुख
अमरावती
11/10/16

#फिरसे#

#फिरसे#

आज बेवजह किसी ने हाल मेरा पूछा हैं !
लगता है शहर का मेरे इलेक्शन आया हैं !
वहाँ गरीब के बच्चे को गोद में उठाया है !
क्यों न हो वोट तो आखिर वोट होता है !
उस सड़क को अभी अभी चमकाया हैं !
शायद, पाँच साल का पूण्य कुछ दिन में जुटाना हैं !
मेरे "समूह" के महापुरुषों की कसम मुझे दिलवाई हैं !
वोट मेरा बाटनें की पूरी तयारी की जा रही है !
आज यूहीं मिजाज किसी ने मेरा पूछा हैं !
मेरे शहर का इलेक्शन जो आया हैं !
सुधीर देशमुख
अमरावती
18/01/17

#गणतंत्र#

सिग्नल वर गाडी थांबल्यावर,
"ती" अचानक आली !
जेमतेम; हो जेमतेमच तरुणी की किशोरीच,
स्वप्नवत जगन्याच्या या वयात,
मातृत्वाचे ओझे सांभाळत !
केविलवाना चेहरा करत,
तिने हात पुढे केला !
बऱ्याच वेळ लक्ष्य न दिल्यावर,
तिने कडेवरचे मूल दाखवले "मुद्दाम" !
विचार करत बसलो किती पैसे द्यावे,
एक, दोन, पाच की दहा !
किती दिले म्हणजे,
संपणार तिच्या हा दैवाचा खेळ !
दूसरी गाडी आल्यावर लगेच वळली,
क्षणभर गोंधळल्यावर वाटले सुटल्यासारखे !
अधिक किती वर्ष दिसणार ती ?
परत एका गणतंत्र दिन ची भर पड़त !
वारंवार सभ्यतेचा बुरखा फाडत!!
सुधीर वि. देशमुख
अमरावती
25 जानेवारी 2017

राजे

ते राजे होते म्हणुनी
आम्ही जगतोय अभिमानानं
देवुनं शपथ स्वराज्याची
त्यांनी जोडले मावळे एकदिलानं
ते राजे होते म्हणुनी.....
जिंकून एक एक गड
त्यांनी पळवलेय शत्रु नेटानं
ते राजे होते म्हणुनी.....
घेवून तलवार भवानी
त्यांनी पाजलय त्यांना पानी
ते राजे होते म्हणुनी.....
घालून वाघ नखे
त्यांनी संपवला खान
ते राजे होते म्हणुनी....
राखून सुरक्षित स्वतः ला
त्यांनी फसवले बादशाहाला
ते राजे होते म्हणुनी..
परतवुनि सुरक्षित परस्त्रिला
त्यांनी उंचवली मराठी मान
ते राजे होते म्हनूनी .......
सह्यन्द्रि ते सातपुडा
वसे मंत्र सर्वांच्या हृदयात
ते राजे होते म्हणुनी
आम्ही जगतोय अभिमानानं
सुधीर देशमुख
अमरावती
19/02/16

#सरकार#

तू देवांचा देव, साधकांचा साधक
तुझे नेत्र तू उघडतो म्हणे,योग्यवेळी
तुझ्या मूर्तिंवर दूध ओसूंडून वाही
बाळ कुशीत अबलेच्या उपाशी राही
तुझ्या दारात रांग भक्तांची मोठी
किती खरी किती खोटी
ताटात तुझ्या रास रत्नाचि पड़े
बाहर कोणी झोळी, घेवून रडे
कोणा बसवती तू उंच महाली
आर्जवे कोणी एका झोपड़ी साठी
घेवून एकदा रुद्रावतार
दाखव आता तुझेच "सरकार"
सुधीर देशमुख
अमरावती
24/02/16
महाशिवरात्री

"माफ कर मामा"

"माफ कर मामा"
मामा काल मामीचा फोन आला होता, तुझ्या त्या जोडीतला एक बैल आजारी आहे म्हणे एक आठवड्या पासून. तुला पैशाची अडचण आहे अशी ही सांगत होती. सध्या तू आर्थिक अडचणीत असतो, आप्पाची शेती चांगली दोन्ही हातानी देत होती ना रे मामा. त्यांच्या सहा लेकीचे व तुझे लग्न या शेतीच्या भरवश्यावरच केले ना रे आप्पाने. एवढा मोठा खटला पण कधी चनचन नव्हती.
काय दिवस होते ते कधी एकदाची परीक्षा संपते व तुझ्या गावी येतो असे वाटायचे, शेवटचा पेपर तर अगदी नकोसा वाटे. उन्हाळ्याची सुट्टी व तुझे गाव हे तर जगण्याचा एक भाग होता. तू तुझ्या बैलगाडीला घेवून फाटयावर यायचा, तासन् तास आम्हची वाट पाहत बसायचा. तुझ्या त्या गाडीतून, कधी तुझ्या घरी पोहचतो असे व्ह्ययचे. गाडीचा आवाज येताच आजी धावत यायची. "आला का रे माया नातू" असे म्हणत एकदा आजीने जवळ घेतले रे घेतले की, त्या कड़क उन्हातला प्रवासही रम्य व्हायचा. हळूहळू तुझ्या सर्व बहिनी व भाचे पोहचायची सर्व घर कसे भरून जायचे. तसे तुझे घर फार मोठे नव्हते पण सर्वाना तिथे जागा होती. गावातली नदी तर गावचा दागीना, गावाला वळसा घेवून जाणारी ही नदी म्हणजे, नवविवाहितेच्या गळ्यातला हार.आज मात्र तिथे फक्त दगड़ दिसतात. टेकडीवरचे रामाचे मंदीर तिथे रोज हरिपाठ होत असे तिथल्या त्या टाळ मृदंगाचे आवाज आजही कानात कायम आहे.
तू शिकला ती शाळा आता पार ओसाड झालीया, तालुक्याला राहणारी एकच मॅडम ती शाळा सांभाळते म्हणे. ती तरी काय सांभाळनार एक दोनच विध्यर्थ्यांना? या शाळेतून शिकुन तुझे काही सोबती आज शहरात मोठ मोठ्या हुद्यावर आहेत असे तूच आम्हाला सांगायचा ना! आता या शाळेवरुन गावतल्या लोकांचा भरवसा कसा रे उडाला? गावातून ऑटोत भरून तालुक्याच्या शाळेत जातात म्हणे आता सर्व मुले. लहान मूल सुद्धा आता गावात शिकत नाही. काय झाले रे मामा तुझ्या या गावाचे. तुझ्या शेतातली आमराई, त्या मोठ मोठ्या आंब्याच्या झाडांवर चढून आंबे तोळण्यात काय स्पर्धा असायची आम्हची. त्या झाडांची काळाच्या क्रूर आघातात केव्हाच् कटाई झालीया. हल्ली आम्हची मूलं मामाच्या गावाला जात नाही. उन्हाळी सुट्टीत गावी जावून राहत असते हेच त्यांना ठावूक नाही. सुट्टीत वेगवेगळ्या शिबिरातुंन ते संस्कार घेत असतात. "वर्षभर महागळ्या शाळांतुन व घरुन संस्कार होत नाहीत का ?" असे तू आता विचारू नको.
तुझ्या मुलीच्या लग्नासाठी तू काळलेले कर्ज अजूनही बाकी आहे म्हणे. तुझा तो सोबती, त्याला आम्ही हरीमामा म्हणायचो त्याने गेल्या वर्षी आत्महत्या केली म्हणे. आप्पाच्या तर कोण्या सोबत्याने नाही केली रे मामा कधी आत्महत्या. दरवर्षी कर्जमाफ़ी ची तू वाट पाहतो पण सरकारे बदलतात परंतु तुझी स्थीती मात्र तीच आहे.
मामा खरं सांगू का तुझ्या या स्थितीला आम्हीच ही शहरातली मंडळी जबाबदार. तुझ्या गावच्या नदिवर आम्ही धरण बांधली,गावचं व शेतीचे पाणी शहराला दिलें. पूर्णवेळ विज आम्ही वापरतो परंतु तुला मात्र भारनियमन. झाडांची कत्तल झाली, त्यामुळे पाऊस कमी. शहरे फोपावली, गावे मात्र ओसाड झाली. गरज असते तेव्हा शेतीच्या मालाला भाव नसतो. तुझा माल बाजारात आला कि भाव पडतो ( पाडल्या जातो) . ओरबडून टाकली रे गावे, खरच पार शेखचिल्ली सारखे केलय आम्ही. मामा खरच तू आम्हा शहरातील तुझ्या भाच्यांना माफच कर.
तुझा भाचा,
सुधीर वि. देशमुख
अमरावती.
18/04/17

#कटींग_पाटली_व_हिप्पीकट

लहापणी न्हावी काकाकडे गेलो की काका खुर्चीवर पाटली टाकायचे पाटलीवर बसने मला फार कमीपणाचे वाटायचे, आपण उगीच लहान असल्याची जाणीव होत असे. एकदा ती कसरत काकाची सुरु झाली की बस, मधे मधे मान आपण सरळ करायची तर काका दुसऱ्या बाजूला एकदम दाबायाचे. समजा त्याच बाजूला ठेवावी तर परत दुसऱ्या बाजूला दाबल्या जायची. नेमके कुठल्या बाजूला डोके ठेवावे हा प्रश्न मनात यायचा अवकाश की समोर एकदम झटक्यान डोकेे दाबल्या जाई व मागच्या बाजूच्या केसावर आक्रमण होई. बऱ्याचवेळा डोक्याला वाटेल तसे झटके देवून झाले की मग कैचीचे काम संपे, मग कैचिची जागा वस्तारा घेत असे. एकदा हा वस्तारा हातात आला की परत डोक्याला वाटेल तसे वाकवून होई कधी या वस्तऱ्यातुन एकदाची मुक्ती होते असे वाटायचे. कसे बसे एकदा हे वस्तरा पुराण संपले की मग सर्व शरीर झटकल्या जाई. मग ते केसाने माखलेले शरीर घरी आई च्या तावडीत जायचे. कटिंग करून काय आलो फार गुन्हा करून आल्यासारखे वाटायचे, या सर्व विधिंविषयी मला काही आक्षेप नव्हता, होता तो फक्त त्या खुर्चीवर पाटली टाकन्याचा. कधी एकदाचे आपण मोठे होतो व थेट खुर्चीवर बसून कटिंग करण्यास पात्र होतो असे सतत वाटायचे. त्या खुर्ची वर बसून मागच्या टेक्यावर आपले डोके टेकवायचं व कटिंग वाल्याने आपल्याला विचारत विचारत केस कापावे हे माझे तेव्हाचे स्वप्न होते. त्यावेळी मना सारखी हेयर कट ठेवण्याचे स्वातंत्र नव्हते. मी साधारण तीसरी मधे असेल, आम्ही त्यावेळी परतवाडाला राहत होतो, हिप्पी कट ची फैशन आली होती. देव आनंद च्या हरे कृष्ण हरे राम चा तो काळ होता. अमिताभ सारखे काही स्टार्स हिप्पी कट ठेवायचे. हिप्पी ठेवली तर पाटलीवर बसून कटींग करण्याच्या मानहानीला तेवढ़ीच अनुकम्पा मिळू शकेल असे मला वाटायचे. माझा मोठा भाऊ त्याकाळी महाविद्यालयात होता त्यामुळे दादाला असलेले स्वातंत्र आपल्यालाही मिळावे असे मला वाटायचे. शिवाय हिप्पी कट ठेवली की आपण या तरुण मुलांच्या गँग मधे हक्काने शामील होऊ असा माझा ग्रह होता. बाबा पोलिस विभागात त्यामुळे त्यांचा लांब केस ठेवन्यास भारी विरोध होता. मोठा भाऊ महाविद्यालयात गेल्या मुळे व तो अमरावतीला असल्यामुळे असेल कदाचित परंतु त्याला मात्र बाबांनी विरोध केला नव्हता. एकदा घरी बरेच आंदोलन केले, रडा-रडी फुगणे वैगरे प्रकार केले, तात्पुरता अन्नत्याग केला. परंतू बाबाला काही मागणी पटत नव्हती, शेवटी आई ने मध्यस्थी केली व बाबा हिप्पी कट साठी एकदाचे राजी झाले. त्या दिवशी मी कटिंग साठी पहिल्यांदा एवढा खुश होतो. आईचे तर सर्व लहान सहान कामे मी पटापट केली, जशी शेजारच्या काकूचे उसने आनलेले जिन्नस परत करने इत्यादी. त्या दिवशी कटींग वाल्या काकाच्या पाटलीवर मी खुशीत जाऊन बसलो. त्यांना वाटेल त्या दिशेने वाटेल तसे डोके दाबू दिले एकदम सहकार्य केले. एकदाची हिप्पी कट झाली. कटिंग करून येताना माझी देह बोली पार बदलून गेली होती, आता आपल्याला मोठ्या मुलांच्या गोष्टीत थेट सहभागी होता येइल असे वाटू लागले. मानेवर व कानावर येणाऱ्या त्या गुंडाळा झालेल्या केसांचे मला भारी कौतुक वाटत होते. त्या दिवशी काकाने पहिल्यांदाच डोक्याच्या मागे आरसा धरून माझे गोल गोल केलेले केस दाखवले. (मी पूर्ण सहकार्य केल्यामुळे असेल कदाचित) कान व मानेवर आलेले ते केस मिरवत मी माझ्याच तोर्यात होतो, परंतु माझा मानभंग दुसऱ्याच दिवशी झाला. मोठ्या मुलांनी एका खेळात मला कच्चा नींबू केले. कच्चा नींबू हा प्रकार फार विचित्र, बिन खात्याच्या मंत्री सारखा. खेळात स्थान तर मीळे परंतू आपल्या सहभागाची फारशी दखल घेतल्या जात नाही. लहान मुलांनी घरी जाउन आईचे डोके खाऊ नये व आपल्या खेळात काही विघ्न येवू नये म्हणून मोठ्या मुलांनी केलिली सोय म्हणजे कच्चा नींबू होय. याशिवाय बारीक चिरीक कामे करण्यासाठी ही बारकी पोर कामी येत होती. अलीकडे सरकार स्थापन्यात देखील या तत्वाची मदत होते. हिप्पी कटचा मोठ्या होण्यात फरसा उपयोग दिसत नव्हता. शाळेत मास्तरच्या हातात सहजच केस लागत होते त्यामुळे मिळू नये त्या गुन्ह्याची सुद्धा शिक्षा मिळू लागली होती. लांब केस असणारी मूलं बदमाशी करण्यात आघाडीवर असतात असा बहुतेकांचा समज असतो. जसे चश्मा असणारी मूलं हुशार असतात असे बऱ्याच लोकांना वाटते पुढे दहावीत मलाच चश्मा लागला व हा गोड गैरसमज माझ्यासह इतरांचा देखील दूर झाला. हिप्पीकटचे फायदे तर काही दिसत नव्हते परंतु तोटे जागोजागी जाणवत होते. मित्रांचे आई वडील वेगळ्याच नजरने पाहू लागले, शाळेत गुरूजीला जसे शस्त्र मिळाले होते तसेच घरी बाबालाही त्यांचा राग शांत करण्यास "केस" हाती लागली होती, तसेही त्यांच्या मनाविरुद्धच मी कटिंग केली होती.
या नंतर मात्र मी हिप्पी कट केली नाही एवढेच काय तर बरेच वर्ष म्हणजे (खरच मोठे होई पर्यंत) लांब केस सुध्दा ठेवले नाही. आज मुलाला कटिंग साठी घेवून गेलो कटिंगवाल्याने मुलाला पाटलीवर बसवले, मी मात्र मुलाकडे उगीच सहानभुतीने पाहू लागलो.
सुधीर वि. देशमुख
रविवार
16/7/17

Monday 7 August 2017

आठवणीतला श्रावण


श्रावण सुरु झाला कि एक नवीन चैतन्य सृष्टीत निर्माण होते.  आषाढ एकादशी साठी आपल्या विठुरायाच्या दर्शनाला गेलेला शेतकरी परतलेला असतो. शेतात पेरणी झालेली असते. सृजनासाठी धर्तीच्या कुशीत बियाणे शांत झोपी गेलेले असते. आषाढ मेघ आपल्या सरींच्या द्वारे जमिनीवर भेटीसाठी उतरतात. धरती तशीच ग्रीष्माच्या तापाने तापलेलेली असते. ती या मिलनाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असते. धर्तीच्या व वर्षा धारेच्या या मिलनातून, धरतीच्या पोटात पडून असलेले बियाणं अंकुरते, जमिनीच्या एक एक आवरणाला विभागत   हलकेच बाहेर डोकावू लागते. त्या कोवळ्या अंकुराला रवी किरणाने स्वतः;ला न्हाऊ घालायचे असते. हळूहळू सर्व जमीन जणू हिरवी शाल आपल्या अंगावर ओढून घेते. पावसाच्या मिलनाने ती पार शहारलेली असते, मोहरलेली असते. हिरवा शालू पांघरून आपले अंग अंग लपवू पाहणार्या धरतीच्या  फुलपाखरू खोड्या करू पाहते. या झाडावरून त्या झाडावर या फुलावरून त्या फुलावर उडत राहणार्या फुलपाखरा सोबत पक्षी देखील आपले सूर मिळवत सामील होतात. 
असे हे सृष्टीचे देखणे रूप घेऊन श्रावण दाखल होतो. श्रावण सर्व प्राणीमात्रावर आपल्या प्रसन्नतेची फुंकर घालतो. वातावरण निर्मळ  व देखणे करत आपल्या थेट हृदयात शिरतो. निसर्गच्या सोबतच धार्मिक उत्सवांची उधळण करणारा हा महिना.  एकापेक्षा एक अश्या उत्साहवर्धक ऊत्सवांमुळे  महिला व लहान मुलांच्या विशेष जवळचा आहे. श्रावणातला  सोमवार सर्वसाधारण सोमवार नसून "श्रावणी सोमवार" असतो, शिवभक्तीचा हा दिवस. पूर्वी शाळा, म्हणजे  आंतरराष्ट्रीय होण्या पूर्वी   अर्ध्या दिवसाची असायची (ग्रामीण भागात अजूनही राहते) त्यामुळॆ मला श्रावण सोमवारचे विशेष आकर्षण असायचे. नागपंचमी,मंगळागौर, राखीपौर्णिमा,गोपाळकाला  व शेवटी पोळा असे एक एक सण म्हणजे आनंदाची मेजवानी. नागपंचमीला आम्ही नागाचे वारूळ शोधून त्याची पूजा करयायचो अर्थात खाली वारुळाची. एरवी साप  दिसला की त्याच्या मागे धावणारे या दिवशी मात्र त्याची पूजा करण्यासाठी दुधाची वाटी घेऊन फिरत. कधी कधी एखादा गारुडी साप घेऊन यायचा त्याच्या दुधासाठी पॆसे गोळा करायचा. दुधाची गरज सापाला  नसून गारुड्याच्या कुटुंबाला आहे हे कळायच ते वय नव्हतं. जे दिसे त्यावर पटकन विश्वास बसायचा. 
रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाचा सण, दुसर्या दिवशी शाळेत जाऊन राखी दाखवत हात मिरवण्याची विशेष गम्मत वाटायची. राखी हल्ली वेगवेगळया प्रकारच्या पाहायला मिळतात आम्हच्या लहानपणी  राखी स्पन्ज पासून बनवलेल्या असायच्या. कालांतराने ह्याच स्पन्जचा उपयोग पाटी पुसण्यासाठी होत असे.. राखीच्या दिवशी भावांपेक्षा बहीणीचिच मिळकत जास्त राहत होती त्यामुळे मला माझ्या बहिणीचा हेवा वाटायचा. दहीहंडीचे प्रकार त्याकाळी लहान गावी फारसे होत नसे. त्याला उत्सवाचेच स्वरूप होते, त्याचे बाजारीकरण झाले नव्हते.  
पोळा मात्र मला तुलनेने जास्त आवडायचा तान्हया पोळा आला की मातीचा नाहीतर लाकडी बैल   घेऊन फिरलो कि भरपूर मिळकत ह्यायची. त्याकाळी पॉकेट मनी सारखा प्रकार आम्हच्या घरापर्यंत पोहचला नव्हता. त्यामुळे खिसा  हा  चिंचा, बोरं, कैरी, कंचे ,गारा इत्यादी ऐवज ठेवण्यासाठीच असतात असा आम्हचा समज होता. म्हणून पोळ्याच्या दिवशी झालेल्या या कमाईचे फार कौतुक होते. पतंग, कांचे पासून ते शाळेच्या गेट समोर बसणार्या आजीजवळून मधल्या सुटीत विविध खाद्य सामुग्री घेण्यात हे धन कामात यायचे. इतर वेळी मात्र घरी येणाऱ्या पाहुण्यावर भिस्त राहायची. पाहुणा आल्यावर उठून कधी जातात व जाता जाता हातावर रुपया कधी ठेवतात यासाठी त्यांच्या  अवती भोवती रेंगाळण्यात बराच वेळ जात असे. शेतकरी या दिवशी आपल्या बैलांची पूजा करतो त्यांना गावात फिरवतो. निसर्गाच्या जवळ नेत प्राण्यांवर प्रेम करायला शिकवणारा हा महिना. आजही एखादी श्रावण सर पाठोपाठ कोवळे ऊन घेऊन येते, सोबतिला  येणारा  शीतल वारा अंगावरून मायेने हात फिरवतो व आठवणींच्या या मोहक दुनियेत बोट धरून फिरवून आणतो.  

सुधीर वि. देशमुख 
अमरावती 
०७/०८/१७

पाऊस त्याचा


वृक्ष


पांडुरंग


संस्कृती


हास्ययोग

निखळ, सहज हास्याचे वयाचे व्यस्त प्रमाण असावे, असे मला बऱ्याच वेळा वाटते. एवढेच नाही तर मनुष्य जो जो मोठा होतो ते ते त्याचे हास्य कमी होत जात असावे. अर्थात याला काही अपवाद आहेतच. मुळात काही वयस्क लोकांना खळखळुन हासणे हे कमी पणाचे वाटत असावे. निखळ हास्य विद्वता या गोष्टी चे सुद्धा व्यस्त प्रमाण असावे, बरीच विद्वान मंडळी चारचौघात खळखळून हसायला कचरतात. आपल्या हसण्याचा चुकीचा संदेश जाईल असे बहुतेक त्यांना वाटत असावे. 
     स्टेटेस्कोप गळ्यात असणाऱ्या व्यक्तीला तर हसण्याच बंधनच असते , असे मला माझ्या बालपणी वाटायचे. पूर्वीच्या घरांतील बाप नावाचे व्यक्ती फारच गंभीर असायचे. आम्ही पूर्वी रहात होतो तिथे शेजारील काका-काकुला चार मूली होत्या मूली तशा चांगल्याच होत्या, पण संध्याकाळी काका घरी परत आले की अचानक त्यांच्या घरात स्मशान शांतता व्हायची. घराचा मालक घरी नसताना मोकळ्या मनाने खुलनारं घर मालक घरी आल्यावर एकदम गंभीर होत असे. त्या तसल्या बदलाची घराच्या भिंतीनाही सवय झाली असावी. आपल्या मूली मोकळ्या मनाने गप्पा गोष्टी करत हसल्या तर बिघडतील असा काहीसा समज त्या काकाचा असावा. ज्या घरात गप्पांचे फळ रंगत नाही ते घर कसले? अबोल, कमी बोलणाऱ्या माणसांच्या घरात जायची मला नेहमीच भीति वाटत आली आहे. असल्या घरांच्या भिंती, त्यातील वस्तू एकदम अंगावर आल्यासारख्या भासतात. ज्या घरातून सुन मुलींचा हास्याचा आवाज येतो त्या घरात वास्तुदोष नसतो असा एक सुविचार नुकताच माझ्या वाचनात आला, दोष वास्तुत असतो की माणसाच्या मेंदूत हा ही एक संशोधनाचा विषय आहे.

      मुळात हसण्यासाठी फारसे कष्ट लागत नाही, परंतु एवढी सहज नैसर्गिक क्रिया आपण कशी काय गमावून बसतो कळतच नाही. हसण्यापासून अशी फारकत घेतल्या मुळे मग हास्य क्लब लावावे लागतात. काही लोकं हास्य क्लब मधे सकाळी जबरदस्ती ने हासतात आता आपण दिवसभर गंभीर राहायला मोकळे झालो अशा समजूतीत दिवसभर राहतात, (सकाळचा विधी करून मोकळे व्हावे तसे). आपल्याला सहज हसताही येवू नये या पेक्ष्या दुर्दैवी गोष्ट कुठली असावी? केवळ आपण सहज हसल्या मुळे समोरील व्यक्तिवरील ताबा जाईल ही एक भीति बऱ्याच जनांना वाटत असते. स्वत: मोकाळ्या मनाने हसणारी इतरांनाही हसवणारी माणसे सदा सर्व काळी तुम्हा आम्हा सर्वांना भेटत राहावी.

सुधीर वि. देशमुख
अमरावती

बाकी नापासांचे काय ?

त्याचा चौथा व शेवटचा प्रयत्न आहे. आतापर्यंतच्या तीन प्रयत्नात तो मुलाखती पर्यंत देखील पोहचला नाही, पोहचला तर तो शेवटच्या प्रयत्न...