Saturday 18 May 2019

गांधीजी व रॅट रेस



देश स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर होता त्यावेळी देशातील काही उद्योगपतींनी गांधीजींना विचारले 'तुम्ही मास प्रॉडक्टशन च्या विरोधात आहात का?' त्यावेळी गांधीजी म्हणाले 'मला प्रॉडक्टशन बाय मासेस अपेक्षित आहे.' औद्योगिकरण्याच्या उत्तेजनात गांधीजींना ग्रामीण भागातील जनतेचं शोषण होईल अशी भीती होती. ते यंत्राच्या पूर्ण विरोधात होते असे म्हणणे चूक ठरेल, उलट यंत्राच्या माध्यमातून एखाद्या कामगाराचे काम सुकर होत असेन तर चांगलेच आहे असे ते म्हणायचे. यांत्रिकीकरण होत असतानाच माणूस हा घटक हरवून जाऊ नये अशी त्यांना भीती होती. कुठलीही व्यवस्था ही इकॉलॉजि व संपूर्ण मानव जात केंद्र स्थानी राहूनच झाली पाहिजे अशी त्यांची अपेक्षा होती. त्यांचे निष्ठावान सहकारी, उद्योजक शांतिकुमार मोरारजी यांना लिहलेल्या एका पत्रात गांधीजी  म्हणतात

 "गाडं आपल्या गतीने चालतय यांतच मौज आहे.  आताचं युग मोटारीचे नसून विमानाचे आहे, असं म्हणतात ना ? पण ही पळापळ क्षणिक आहे. मनुष्यजात जोवर आहे तोवर आपले पाय आपल्या बरोबर राहणार आहेतच. या दोन पायाचा वेग ज्याला पटला समजला ; तो जिंकला म्हणायचं."

प्रचंड स्पर्धेच्या (रॅट रेस) नादात पुढे पुढे निसर्गीय संसाधनांचे देखील मोठया प्रमाणात शोषण होईल अशी त्यांची चिंता होती. आजची बकाल झालेली खेडी व निसर्गाची, वनसंपदेची, वन्यजीवांची  झालेली वाताहात  बघितले की गांधींची भीती किती रास्त होती हे कळते. मनुष्यासाठी निर्माण केलेल्या व्यवस्थेची शिकार तो स्वतःच होत असेल तर अशा व्यवस्थेचे कुठेतरी नियमन करावे लागेल. चार्लीचा या विषयावरचा त्या काळातील "मॉडर्न टाइम" हा चित्रपट पाहला की त्याचे द्रष्टेपण लक्षात येते. शेवटी काय ज्या मनुष्य जाती साठी हे सर्व सुरू आहे तो जगला पाहिजे तरच या रॅट रेसला अर्थ राहील.

सुधीर वि. देशमुख
अमरावती
19/05/19
बापू प्रात: स्मरणीय





बाकी नापासांचे काय ?

त्याचा चौथा व शेवटचा प्रयत्न आहे. आतापर्यंतच्या तीन प्रयत्नात तो मुलाखती पर्यंत देखील पोहचला नाही, पोहचला तर तो शेवटच्या प्रयत्न...