Tuesday, 5 September 2017

मिळून सारे

मिळून सारे

हेही असेच आहे तेही तसेच आहे
काळे असो की पांढरे सारे ससेच आहे

कोणास काय म्हणावे कोणास काय टोकावे
मिळून  सर्व सारे घास आपआपला खात आहे

मागे गर्दी कसली माणसांची ही तर झुंड आहे
पसरुन मोकळा पदर पुढे पुढे सरकत आहे

ही कसली आमची वस्ती, कसली सभ्यता
करावी गस्त ज्याने, लूटुन तो मोकळा फिरत आहे

सुधीर देशमुख
05/09/17

No comments:

Post a Comment

दे रे हरी.....

मागे एकदा मी आमच्या शहरातील आळशी लोकांची बैठक बोलावली होती.  सभेला एकही आळशी आला नाही. सभेला एकही आळशी नसल्यामुळे मलाच स्वतःला सभा घ्यावी ला...