Thursday 7 September 2017

प्रिय आशाताईस

प्रिय, आशाताई
आज तुझा  86 वा वाढदिवस उत्साह काय असते हे तुझ्याकडून शिकावे. आज तू 86 वर्षाची झालीस परंतु तुझे  चैतन्य लखलखित आहे. "मली मली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे" हे गीत ऐकताना कोणी तरी रूपगर्विता खरोखरोच ही तरुण्याची कोमल रेशमी शाल अंगावर घेवून एकणाऱ्याच्या कालिजा खल्लास करत आहे असे वाटते. किती गावं आणि कसं गावं हे तुझ्याकडूनच शिकावे. इंडस्ट्रीत लतादीदीचे नाणं खनखणित असतांना तू तुझे वेगळेपण सिद्ध केलेस. आजी,मावशी,काकू सारख्या संज्ञा तुझ्या करीता नाहीच, तु फक्त आशाताई. "उरले उरात काही आवाज चांदन्याचे", खरच तुझ्या सुरेल आवाजाचे चांदन्याचे शिंपन निरंतर सुरुच आहे. तुझा आवाज कायमच आमच्या काळजाचा ठोका चुकवनार आहे. सांगू तरी कसे मी वय कोवळे उन्हाचे ही ओळ भटांनी तुझ्याच साठी लिहली असावी. आता तुझे हे नक्षत्राचे देने तमाम रसिकांचे झालेले आहे. सख्या रे अनुदिन चीज नवीन गात गात तुझ्या स्वरांची बिन नाविन्याने झंकारत आहे. तुझ्या विषयी काय लिहावे ? स्वर्गातून उतरलेली परीच तू, जोपर्यन्त ईथे गाणे आहे तो पर्यन्त तुझे नाव कायम रसिकांच्या मनात टिकून राहनार आहे. तुझ्या 60 व्या वाढदिवसाला कवि सुरेश भट यांनी लीहलेली ही कविता आजही तुझ्या स्वभावला पूर्ण न्याय देवु शकते ती कविता आज शेयर करत आहे. तुझ्या आवाजाचा ऋतु सतत हिरवाच राहो या तुझ्यासाठी परमेश्वरास प्राथनेसह.



तुझ्या  एक ऋणी
सुधीर देशमुख
08/09/17

No comments:

Post a Comment

बाकी नापासांचे काय ?

त्याचा चौथा व शेवटचा प्रयत्न आहे. आतापर्यंतच्या तीन प्रयत्नात तो मुलाखती पर्यंत देखील पोहचला नाही, पोहचला तर तो शेवटच्या प्रयत्न...