Monday 7 August 2017

सुगन्ध ओल्या मातीचा व नवीन पुस्तकाचा


परीक्षा सुरु झाली की ओढ़ राहे ती शेवटच्या पेपरची एकदाचा तो पेपर कधी संपला रे संपला की झाल्या सुट्या सुरु. सुट्या सुरु झाल्यावर परत ऐखादा छंद शिबिरात किंवा संस्कार शिबिरात लटकवण्याचा तो काळ नव्हता. मुळात संस्कार हे कुठेतरी शिबिरात जावून शिकावे लागते हेच तेव्ह्याच्या पालकांच्या गावी नव्हते. सुटीचा सम्पूर्ण दिवसावर स्वतःचा हक्क राहयचा. त्यामुळे उठाची घाई नव्हती तशीच झोपाची नाही. सुटीतले अर्धे अधिक दिवस मुक्काम मामाच्याच गावी राहे. आमच्या मामाच्या गावातून चंद्रभागा नदी जाते, ही नदी म्हणजे शुद्ध आनंद एकदा सकाळी नदीवर गेलो की तास अन तास तिथेच. शेतात शिदोरी नेवून ती खान्यात तर वेगळीच गम्मत राहयची. तेव्हा शेतात भरपूर आंब्याचे वृक्ष होते. त्या झाडावर चढून शाका खायच्या. नदीच्या बाजूने थड़ी असायची थडितले टरबुज काकड़ी आम्ही शिकार करण्यात तरबेज झालो होतो. मामाचे घर लहान होते पण अडचण कधी गेली नाही. दोन्ही घरच्या आठ बहिनी त्यांची मुले सर्वाना ते घर सामावून घेत असे. रात्र झाली की बाहेर आकाशाचे छत पाहत झोपन्यात वेगळीच् गम्मत होती. त्या निळ्या नभातले चांदणे स्पष्ट दिसायचे ते मोजता मोजता झोप कधी लागयाची कळे सुद्धा नाही. हळू हळू हे दिवस संपायचे एक एक माहेरवाशिन आपआपल्या सासरी परत निघायची. निघता निघता परत परत माघारी फिरने रडने व्हायचे, सोबत मामा राहायचा. दिलेले आंबे घेवून जाणे पाहुण्याना पोहचुन देणे अशी दुहेरी जबाबदारी मामाच्या खांद्यावर राही. 


            एक एक दिवस संपत, हळू हळू वातावरणात बदल होत जातो. दूर कुठे गेलेले ढग परत येवू लागतात. येतांना सोबत पाऊस घेवून येणार. चुपचाप येईल तो पाऊस कुठला. एकादया नवरदेवा सारखा विजांच्या वाद्यासहित तो येतो. ग्रीष्माच्या तप्त तापाने दुभंगलेली जमीन मिलनासाठी आतूर झालेली असते. त्यांच्या मिलनातून एक वेगळा सुगंध आसमन्तात दरवळतो. याच काळात शाळा सुरु होत असे. "शाळेभोवती तळे साचुन सूटी मिळेल का?" असे विचारण्यासाठी भोलानाथ आपल्या वस्तीत यावा असे सतत वाटायचे. आई नविन पुस्तके वही कव्हर लावायला घ्यायची. मी मात्र नविन पुस्तकं घेवून त्यांचा सुहास घेण्यात कधीचाच हरवून जात असे. तेव्हाचा त्या वयातला तो मातीचा नवीन पुस्तकांचा सुगन्ध आज बाजारात असलेल्या महागतल्या महाग परफ्यूम किंवा डिवोत नाही भेटत. काळाच्या प्रवाहात तो सुवास कुठे हरवलाय? 

"ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार"  या ओळीचा अर्थ आता अर्थारजनास लागल्यावर कळत आहे.



सुधीर विनायकराव देशमुख
अमरावती

No comments:

Post a Comment

बाकी नापासांचे काय ?

त्याचा चौथा व शेवटचा प्रयत्न आहे. आतापर्यंतच्या तीन प्रयत्नात तो मुलाखती पर्यंत देखील पोहचला नाही, पोहचला तर तो शेवटच्या प्रयत्न...