Sunday 6 August 2017

बोन्साय

देव आनंदच्या C I D या चित्रपटात शमशाद बेगमच्या तरल आवाजातील अतिशय सुन्दर अविट गोडीचे गीत आहेया गाण्याचे विशेष असे की हे गाने आपल्या नजरे समोर चित्र उभे करते.
बूझ मेरा क्या नाम रे, नदी किनारे गाँव रेपीपल झूमे मोरे आँगना, ठण्डी ठण्डी छाँव रेआपले नदी च्या काठावर असलेले गाव, तिथेच असलेले माझे घर आणि त्या घराच्या विस्तीर्ण अंगणात असलेले विशाल पिम्पळाचे झाड़. आता एवढा मोठा वृक्ष अंगणातच उभा म्हटल्यावर त्याची सावली साहजिकच अंगणात पडणार. अश्या विस्तीर्ण झाडांच्या सावलीतचअनेक पिढ्या मोठ्या झालेल्या आहेत.
स्मिता तळवलकर चा चौकट राजा चित्रपटातील एक संवाद आजही माझ्या मनात अगदी कायम आहें. मुळची कोकानातील स्मिता तिच्या पतीसोबत पुण्या- मुंबई सारख्या शहरात राहत असते. तिला कुठल्या तरी दुखानात बोनसाय केलेले आंब्याचे झाड़ दाखवण्यात येते. लहानपण कोकणात घालवलेली ती मोठ-मोठया अश्या आम्रवृक्षांवर खेळलेली, आंब्याच्या झाडाचे असे विकृत रूप नाही पाहू शकत . (त्याला दिलीप प्रभावलकर च्या मानसिक अवस्थेचा सुद्धा संन्दर्भ आहे .) ज्या झाडांच्या अंगा खांद्यावर मी खेळली त्याला अश्या खुज्या अवस्थेत नाही पाहू शकत असे काहीसे म्हणून ती निघते.


अंगन गेले, घर मोठी झाली, त्या मधे चकचकित अंतर्गत सजावट आली. या सजावटीतच मोकळ्या अंगणातील ते विशाल झाड़ बोनसाय होऊन दीवानखान्यात आले. विशाल झाडांच्या सावलीत जिथे मन शांत व्हावे , "तुका मने होई मनाशी संवाद" अशी भाव अवस्था ज्याच्या चरणी बसून व्हावी, तिथे ही कुत्रिम रित्या बोनसाय केलेली झाडे आली. झाड़ तर हवे परंतु त्याचा विस्तीर्ण पणा झेपेल एवढी जागाच नाही, बोनसायने त्यावर मार्ग काढला.
हळूहळू विस्तर्रणता गेली, मोठेपन गेलेे, चिंतन गेले, उमदेपणा गेला, नात्यातली सहजता गेली, निसर्गाची क्रूर थट्टा करता करता आपलाच कधी #बोनसाय झाला कळले सुद्धा नाही.

सुधीर वि. देशमुख
अमरावती
19/05/17

No comments:

Post a Comment

मंगल गाणी मंजुळ गाणी ?

©सुधीर वि. देशमुख "बाकी काय तुमचं काय ठरवायचं ते ठरवा पण लग्नात संगीत संच मात्र अजिबात ठेवू नका!" मुलाच्या मावसाजीने न...